Friday, 25 October 2013

चित्रपट-टिव्ही मनोरंजन माध्यमांतील व्यवस्थापन


कलर्स, स्टार प्लस, सोनी, एम.टिव्ही, झी टॉकीज, ई-टिव्ही, कार्टून नेटवर्क अशा अनेक मनोरंजन माध्यमांना प्रेक्षकांकडून हमखास प्रतिसाद मिळत असतो, तेव्हा मनोरंजनमुल्य असलेल्या सर्व कार्यक्रमांना इथे जागा असते. अमाप पैशांवर चालणाऱ्या या कार्यक्रमांना मरण नाही. सलग सहा सिझन चालणाऱ्या कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चनची कारकीर्द, कंपनी व प्रभाव पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने उधाण दिले. सलमान खानच्या दस का दम ने सोनीचा टिआरपी वाढवला, ई-टिव्ही ने मरगळ उपटून टाकत नव्या जोमाने केबीसी मराठीचा माध्यमातून कॉर्पोरेट प्रोग्रामिंगला भर दिला. चित्रपट कसा काढावा...? या कोल्हाटकर यांच्या पुस्तकातून मराठी चित्रपटांचा बजेट कसा असतो यांचे सविस्तर वर्णन केले आहे. अ, ब, क दर्जा मिळालेल्या चित्रपटांना शासकीय अनुदान वीस ते चाळीस लाखांपर्यंत मिळते खरे पण फक्त निर्मिती मुल्याने चित्रपट निर्मात्याचे आर्थिक गणिते सोडवली जात नाहीत. टिव्ही मालिका विश्वासाचेही कीहीसे असेच आहे.
चित्रीकरणासाठी फिल्मसिटीमधिल भाडे परवडत नसल्याने आऊटडोअर शूट किंवा बंगला भाड्याने घेऊन शूटींग केली जात आहे. एक कन्सेप्ट नोट/प्रपोजल पास करण्यासाठी चाळीसहून अधिक निर्मात्यांचे दरवाजे वाजवलेल्या मंगेश हाडवळेला टिंग्या काढायला ४१ वा निर्माता हो म्हणाला. पण आजच्या अतिउत्साही निर्मात्याला दर्जाहीन स्क्रिप्टपण आवडायला लागते. कारण शो मस्ट गो ऑन...नावाची वारंवारता टिकून राहावी आणि प्रसारमाध्यमांमध्ये झळकत राहावे यासाठी हा प्रपंच असतो.फिल्मोग्राफी वाढवण्याच्या नादात निर्माता-दिग्दर्शकाचे तीन-तेरा वाजतात.  अभिनेत्याचेही मार्केट डाऊन होते. अशा वेळी छोट्या पडद्याचा दरवाजा वाजवला जातो. चित्रपटगृहात न येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांच्या घरीच मनोरंजन हवे की काय म्हणून सेलिब्रेटींची लाइन टिव्ही मनोरंजनाकडे लागली आहे. १०० कोटी क्लबचे हिंदी चित्रपट आणि पाच कोटींखालील मराठी चित्रपट त्या त्या क्षमतेनुसार कमाई करतात. प्रमोशनवर विशेष लक्ष आता मराठी रिअॅलीटी शोज देवू लागले आहेत. तेव्हा सेलिब्रीटी येता घरा, होममिनिस्टरवर बायकांचा हशा हा सुखद अनुभव.
जाहीरात....एका अर्थाने मनोरंजन माध्यमच. त्यांचे अर्थकारण व प्रसारमाध्यमांमध्ये त्यांचे महत्त्व वेगळे सांगायला नको. मानवी मानसिकतेचा व गरजांचा विशेष अभ्यास असलेल्या जाहिरातदाराला काँडोमपासून कॉस्मेटिक्सपर्यंत, गव्हाच्या पीठापासून टपरवेअरपर्यंत, साबणापासून ते सिंगापूर सहलीपर्यंत व शिक्षणसमस्थांपासून रोजगार वेबसाईटपर्यंत सर्वांची माहिती फूकट उपलब्ध करून देण्यात हे जाहिरात विश्व पटाईत असते. माध्यम तंत्रज्ञान महाग असतात, त्यांचे मेंटेनन्स, कर्मचाऱ्यांचा पगार, सेलिब्रटीजच मानधन, ओबी व्हॅन व इंटरनेट ब्रॉडकास्टींग चार्जेस या सर्वांचा आर्थिक उहापोह करताना जाहिरात देणाऱ्या संस्थांकडे चातक पक्षासारखे आ वासावे लागते. ट्रेड फेअर, इव्हेंट, कॉन्टेस्ट, गिफ्ट, गेम्स, लाईव्ह कन्सर्ट, कॉलेज फेस्टीवल स्पॉन्सरशीप, संमेलनपरिषदांना मिडीया स्पॉन्सरशिप यांकडे सध्या टिव्ही चित्रपट मनोरंजन माध्यमांचा ओढा वाढत आहे. मनोरंजनमुल्य एकट्या कार्यक्रम निर्मात्याकडे नसून सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कौटूंबिक आर्थिक व राजकीय व्यवहारात आहे, हे वेळोवेळी माध्यमांना जाणवले. इतकेच नव्हे तर मन मारून समाजसेवेत उतरलेल्या मनोरंजन विश्वातील अभिनेते निर्माते, दिग्दर्शक आता प्रतिमानी निर्मितीसाठी, श्रमदान, अर्थदान, वेळदान देत आहेत.
मिडीया इकॉनॉमिक्स हा सर्व सामान्यांपर्यंत न पोहेचलेला विषय बीएसई व एनएसई तसेच चेंबर्स ऑफ कॉमर्स व इंडीयन मर्चंट चेंबर्समध्ये विकासाचा केंद्रबिंदू म्हणून गणले जात आहेत. मनोरंजन सेवा उद्योगाने देशाचे आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक निकष उंचावले. यामुळे युवा, गृहिणी, बालवर्ग यांना नादाला लावणारे मनोरंजन क्षेत्र कितीही दर्जाहिन का असेना, पैसा फेक-तमाशा देख या उक्तीला सलाम केला जातो. जीवन व मालिका-चित्रपट यांना समान धाग्यामध्ये बांधले आहे. म्हणूनच प्रेक्षाकांच्या मनाशी जोडलेली ही नाळ न तुटणारी आहे.
क्षणभर विरंगुळा म्हणता म्हणता क्षणभरात या माध्यमाच्या आहारी गेलेला आजचा तरूण, गृहिणी व बालवर्ग यांना मिडीयाक्रसी आता कळायला हवी. इतकेच काय ते सांगता येईल, सुचवता येईल.      






No comments:

Post a Comment