आताच्या वाढत्या
औद्योगिकीकरणाच्या युगात तंञज्ञानाचा प्रसार देखील झपाट्याने होत आहे. आताची पिढी
म्हणजे अगदी आताच्या या युगाला सुट होणारीच म्हणावी लागेल. त्यात भरीसभर म्हणजे, आज
कालची लहान मुले ही असामान्य व्यक्तिमत्वात गणली गेली पाहिजेत. आधुनिक तंञज्ञानाने तर अगदी लहानांपासून ते
मोठ्यापर्यंत काही गोष्टींचे सर्वांना वेड लावले आहे. मग तो मोबाईल असो वा
काँम्प्युर, हल्ली तर आय-पॉड, आय-पॅड, आय-फोन यांसारख्या गोष्टी फार प्रचलित आहेत. परंतु या
सर्व गोष्टींच्या वापरामध्ये मोठ्यांपेक्षा लहानांचा वाटा जास्त अहे. आजच्या
पिढीला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान हे सर्व साधारण माणसापेक्षा जास्त आहे. या सर्व
गोष्टीमध्ये दिवसेंदिवस होणारे नवनविन बदल हे देखिल आजच्या पिढी साठी साधारण आहे.
आधुनिक तंञज्ञानामुळे
आपल्याला नवनविन गोष्टी पहावयास तसेच अनुभवायला मिळतात. यामुळे मिळणारे ज्ञान
देखील अत्यंत महत्वाचे ठरते. अशा ह्या तंञज्ञानाच्या जोरावर सध्या जगाच्या चारही
दिशांना फिरत आहेत ते सोशल नेटवर्कींगचे वारे. सोशल नेटवर्कींगचे हे वारे प्रत्येक
घरात देखील घुमत आहेत. जर आपल्याला सोशल नेटवर्कींग बद्दल विचारले तर आपल्याला
बोटावर मोजता येईल एवढेच उत्तरे सांगु शकतो, परंतू ते तितकेच नसुन त्याहुन अधिक
आहे.
सोशल नेटवर्कींगकडे
बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण हा वेगळा आहे. कोणी या सोशल नटवर्कींगला व्यसन
ह्या दृष्टीकोणातून पाहतात तर कोणी काळाची गरज ह्या दृष्टीकोनातून पाहतात.परंतु
वस्तुस्थिती ही वेगळीच आहे.ही काळाची गरज तर आहेच पण काहीजण त्याला व्यसन म्हणून
स्विकारतात. आज आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टींची माहीती सोशल
नेटवर्कींद्वारे कोणत्याही वेळी मिळवता येते.तसे पाहता आपल्या जीवनात काही
गोष्टींमुळे तोटेही होतात अथवा फायदेही होतात तसेच या सोशल नेटवर्कींमुळेही फायदे
ही आपल्याला होऊ शकतात किंवा तोटेही होऊ शकतात.
No comments:
Post a Comment