Friday, 25 October 2013

एक प्रकारचे व्यसनच आहे फेसबुक....!


आजच्या घडीला फेसबुक तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनले कधी व याच सोशल मीडीयाने तरूणाईचा वेध घेतला कधी, तेच कळत नाही. माझ स्वतःचच घ्याना, मी ३२ वर्षाचा असून दिवसाचे काही तास नियमीतपणे मी फेसबुकला देतो. बूकपेक्षा फेसबुक आज युवामानाचे खाद्य बनले आहे. बोलावे, लिहावे, वाचावे ऐकावे तेवढे थोडेच. हा फेसबुकचा महाकाळ आहे. येथे युवाशक्ती एकवटली आहे. बायका प्रेयसी सोडेल पण फेसबुक नाही इतके गंभीर व्यसन अजच्या नेटसावी युवकांना लागले आहे. ग्रूप, शेअर, कमेन्ट, लाइक, अपलोड व  डाऊनलोड अशाच तांत्रीक भाषेत त्याच्या दिवसाची सुरूवात व रात्रीचा शेवट होतो. ऊँ फेसबूकाय नमः असेच काहीसे तो पूजत असावी.
कोणाचा वाढदिवस कधी आहे हे जाणून घेण्याचे दूसरे आणि महत्त्वाचे व्यासपीठ म्हणजे फेसबुक. वाढदिवस हा फेसबूकीय युवकांचा जिव्हाळ्याचा विषय सोबतीला गुगल इमेज आहेत बर्थडे ग्रीटींग्स पुरवायला. घरातील, कट्यावरील, ऑफीसमधील, हॉस्टेलमध्ये किंवा हॉटेलमधील वाढदिवस साजरा करण्याच्या फोटोगॅलरीने तुटुंब भरलेल्या अनुभवाची व स्मृतींची इ-शिदोरी हा बर्थ डे बॉय / ही बर्थ डे गर्ल आपला जगभर फेसबुक फेन्डसाठी उपलब्ध करून देते. आज माझा दिवस असे हक्काने म्हण्याच दिवस म्हणजे वाढदिवस. इतका संकूचित विचार करून कसे चालेल. यैसोबत अनोळखी मित्र-मैत्रीण अँड करून स्वभावदर्शनाशिवाय त्यांच्याशी संवाद साधून शेखचिल्लीसारखी अवस्था करून घ्यायची आणि मग उगवतो, उफाळतो फेसबुक ज्वालामुखीचा उद्रेक.

इंटरनेटच्या माध्यामतून जगाने खरंच देश जवळ आणले पण पालकांना आपल्या मुलांपासून दूर केले यात मात्र शंका नाही. घरात असूनही झाल्यावर पालकांना मुलांची काळजी वाटते आणि फेसबुक नियंत्रणासाठी ओरडा, धाक, अभ्यासाचा जोर अशा अनेक मार्गानी पालकांचे मुलांना समजावणे होते. पण कसले काय? सायबर कॅफ, मित्राचे घर किंवा मोबाईल इंटरनेट, स्प्रिंग दाबू तेवढी तिपटीने प्रेशर देते तसेच युवकांच्या फेसबुक नियंत्रणाबाबत आहे. ३ इडियटसचा चूकीचा विचार  आचरणात आणून हा इडियट पालकविरोधी भुमीका घेतो. लोकमत ऑक्सिजनमध्ये एकदा बालक-पालक संवादाचा अभाव स्पष्टपणे मांडण्यात आला. जनरेशन गॅपच्या नावाखाली आता माणसांची व्यक्त होण्याची माध्यमे बदलली आणि माणूसकी पेक्षा फेसबूकी अधिक होवू लागली, माहामानवांच्या अध्यत्मकगुरूंच्या व मनोरंजन विश्र्वातील अभिनेता-अभिनेत्र्यांच्या विकृत फोटोमॉर्फने कहर केला आहे. असे नाही की, युवामान चांगल्या गोष्टींकडे आकर्षित होत नाही. मुद्दा हा आहे की तो किती खोलवर आकर्षित होतो व अधानुकरणाने तो स्वतःच्या आकलनशून्य क्षमतेचे किती उदाहरणे पुढे आणते

No comments:

Post a Comment