आपल्या भारताची
खरी ओळख म्हणजे आपली संस्कृती. या संस्कृतीला समोर ठेवूनच भाषा, सण-उत्सव, राहणीमान,
पेहराव, अन्न कृती इ. गोष्टींचा समावेश त्यात होतो.
महिलाविषयक संस्कृतीदर्शनाबद्दल
Socialmediatoday.com या संकेतस्थळामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. यूनेस्कोच्या
सांस्कृतिक विकासाच्या प्रकियेला फेसबुकने गती दिली. शब्द, चित्र, व व्हिडिओच्या
एकत्रित व्यापारातून फेसबुकने व इतर सोशलमिडीयाने संस्कृतीचा मानवजीवन शौलीला
समृद्ध केले. संस्कृतीकसंवर्धन हा एकमेव उद्देश फेलबूकचा नसला तरी WAY OF
EXPRESSION हे मानवी संस्कृतीचे मूळ येथे मोठ्या प्रमाणात दिसते.
याबाबत फेसबुकच्या
झूकेनबर्गनने सीएनएला दिलेल्या मुलाखातीमध्ये खूप चांगले म्हटले की मानवी संस्कृतीचा
जगभर प्रसार करण्यासाठी फेसबुक नेहमीच पुढाकार घ्यायला तयार आहे. पाच बिलीयन
लोकांपर्यत फेसबुक पोहचवून आंतराष्ट्रीय सांस्कृतीक सलोखा स्थापण्याचा माझा मानस
आहे. गावाची शेती, सायपन, सरपण, पोळा, शेतकरी जनजीवन हे आपले अँग्री-कल्पर असताना
शहरी चोचल फेसबुकवर पूरवून फालतू गप्पा मारण्यात कसली आलीय संस्कृती? असे काही टीकाकार म्हणतात, परंतु शेतकरी जनजीवनाची ओळख व कृषी संस्कृतीचा मानाचा
तूरा ग्रामीण युवकांनी फेसबुकवर आणून या टीकास्त्राची धार कमी केली.
हल्लीच्या
फेसबूकच्या जमान्यात नवविवाहीत जोडपे आपल्या जोडीदाराला समजून घ्यायला फेसबुकवर
त्याचे/तिचे
अपडेटस्, फेन्डस ग्रूप व कोणत्या विषयाला कसे लाईक/कमेन्ट
दिले आहेत, यावरून एकमेकांबद्दल निष्कर्ष लावतात. वैवाहिक जीवन, कुटूंबकलह, केवळ
फेलबूकच्या संशयावर होत नसली तरी भारतीय कुंटूबव्यवस्थेमध्ये संस्कृतीच्या
ऱ्हासाचे एक प्रमूख कारण म्हणून F.B पुढे येत आहे. तेव्हा
संस्कृतीकरक्षक केव्हा संस्कृतीकभषक होईल कळणारही नाही. विदेशी संस्कृतीचे द्योतक
ठरलेल्या फ्री टॉक व फ्री मिटींग्सना आजच्या भाषेमध्ये अफेअर म्हणतात. पीढी बदलली,
असे म्हणतात. पण पीढी बदलवण्यात फेसबुकचा मोठा हात आहे, हे नक्की.
No comments:
Post a Comment