Friday, 25 October 2013

नवमाध्यमाचा खासगी आयुष्यातील आगमन.


आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सर्वात चिंतीत असलेला घटक म्हणजे पालक. आपल्या पाल्यास लागलेल्या सोशलमिडीयाच्या वेडामुळे ते नेहमीच हैराण झालेले आपण पाहिलेच असेल. परंतू चिंतीत असलेले हेच पालक आज चक्क  सोशल मिडीयापैकी असलेल्या फेसबुकचेच युजर्स आहेत.
आज सोशल मिडीया मुळे एक मोठी बाजारपेठच निर्माण झाली असून तीने ग्राहकांच्या थेट खिशातच स्थान मिळवले आहे. प्रत्येक स्मार्टफोन म्हटला की आपसूकच सोशलमिडीयाचा वापर हा आलाच, याचाच पुरेपुर वापर करतानां सध्या ग्राहक दिसतो. दैनंदीन अपडेट्स मध्ये साधा ताप आला किंवा मुड नाही अशा भावना सुद्धा हल्ली फेसबुकवरुन झळकु लागतात.
मुलींच्या बाबतीतील कोणतेही अपडेट्स जसे, अघोषित नियमाप्रमाणे जर कधी एखाद्या मुलीने आपल्या भावना सोशलमिडीयावर विशेषतः फेसबुकवर व्यक्त केल्या की, मग कॉमेन्टस् चा ओघ ही मोठ्या प्रमाणात असतो. जणु प्रत्येकालाच तिची काळजी लागुन राहिलेली असते. अशा प्रकारे भावना व्यक्त करण्यासाठी हल्ली सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
भावना व्यक्त करण्यासाठी जसे नवतरुण उत्सुक असतात त्यामध्ये लहानांपासुन जेष्ठांपर्यत सर्वच उत्सुक असतात. आपल्या भावना ,मते फेसबुकसारख्या माध्यमातुन लोकांपर्यत पोहचवण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. आताची लहानमुले तर आपल्याला हवी असलेली व्हिडीओ गेमची सिडी ज्यांच्याकडे असेल त्यांनी कृपया मला द्यावी, चक्क अशा मागण्या करतानां दिसतात. त्यांबद्दल काय म्हणायचे, लहानच आहेत ते पण तरुणांचे काय.. पचपचीत पाणी केसानां लावुन वेड्यावाकड्या पोझ मध्ये काढलेल्या फोटोनां येणारे लाईक्स बघुन किंवा कमेन्ट्स बघुन भलतेच खुष होतात. यामध्ये मुलींची संख्या यापेक्षा कैकपटीने जास्त आहे. ज्या महिला फेसबुकवर आहेत त्या त्यांच्या प्रत्येक पाककलाकृतीचे आकर्षक फोटो काढुन फेसबुकवर आपलोड करतात.
अशा प्रकारे समाजातील प्रत्येक व्यक्ती हा फेसबुक सारख्या सोशल मिडीयाचा आधिन झाला आहे. असे म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही. पण त्याच्या बेसुमार वापरांमुळे आपली खासगी माहिती कळत नकळत सार्वजनिक होऊन जाते आणि याचेच दुष्परिणाम आपल्याला सोसावे लागतात.
इंटरनेटच्या वाढत्या प्रभावाने त्याचा नको असलेला मोह आवरता घेत सोशल मिडीयाचा आपल्या खासगी अशा सुंदर जिवनात होणारा प्रवेश/ आगमन आपणच रोखु शकलो तरच आपण या सोशल मिडीया नावाच्या आजाराचे वैद्य बनु शकतो.




No comments:

Post a Comment