
आयबीएन लोकमतच्या ८० पत्रकारांना बाहेर काढताना
रिसेशनचे कारण दाखविले. परंतू माझ्या विश्वसनीय सूत्राने ही अफवा आहे, खरे कारण
वाढता चंगळवाद , ओव्हरइगो व फसवाफसवीचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. रिकव्हरीसाठी
जाहिरातदार वाढवून तसेच मार्केटिंग तंत्र अधिक वापरून प्रसारमाध्यमांनी सर्व
मर्यादा ओलांडल्या, असे मिडीया बिझनेस, ब्लॉगस्पॉट, इनमध्ये रॉबर्ट पिकार्ड यांनी
म्हटले.
वर्ल्डमिडीया इकॉनॉमिक्स अॅन्ड मॅनेजमेंट
कॉन्फरन्स २०१२ (ग्रीस) मध्ये सर्व देशातील माध्यमतज्ञांनी, उद्योगपतींनी व
वृत्तसंपादकांनी सहभाग नोंदवला. २३ ते २७ मे दरम्यान ग्रीसमधिल धेसालोनिकी येथे
झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये
माध्यम अर्थव्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा चर्चीला गेला.
मुंबईमध्ये फोर्ट, नरीमनपॉईंट, चर्चगेट, अंधेरी,
बांद्रा, क्रॉफर्ड मार्केट, मंत्रालय परिसर व समुद्र किनाऱ्यालगत जागा मिळणे
महाकठीण असताना अनेक वृत्तपत्रे व टिव्ही वृत्त्वाहिन्यांचे पाचशे ते पाच हजार
स्क्वेअर फूट जागा भाडेतत्वावर का होईना सहज मंजूर होतात. तेव्हा महिन्याला एक लाख
ते चार लाख कॉर्पोरेट भाडे भरणार कसे याचे सोपे उत्तर म्हणजे जाहिराती. मोठ्या पेड
अर्टीकलमध्ये बारीकसे कुठेतरी ADVT./ ADVERTORIAL लिहीलेले असते. अज्ञान वाचक त्या न्यूज फॉर्मेटच्या जाहिरातीला फासतो आणि
चुकीचे मत तयार करतो. वृत्तवाहिन्यांतील समिशन बेस्ड प्रोग्राम्स किंवा प्रमोशन
कॅम्पेनचा एक भाग म्हणून उफाळलेला वाद सामान्य प्रेक्षकांचा कल्पनापलिकडले असते.
तेव्हा रिसशन दरम्यान पेडन्यूजचे वाढते जाळे मिडीया इकॉनॉमिक्स करेक्ट होतो पण
इथिकली राँग होतो. यातून इकॉनॉमिक्स ऑफ लाय (खोट्यांचे अर्थशास्त्र) उद्यास आले
आणि एक्स्प्रेशनपेक्षा इंप्रेशनला महत्त्व आले आणि कंटेंटपेक्षा प्रेझेंटेशनला
महत्त्व आले. Justinhind.wordpress.com या संकेतस्थळावर
जाहिरातींचा पत्रकारीतेवर वाढता प्रभाव एका वाक्यात बसवला. ते वाक्य असे की, Advertising is journalism and in every good
news or positive news, there is paid news.
तेव्हा आता तुम्हीच ठरवा, जागतीक
महामंदीमध्ये भीक मागण्याची पाळी येऊ नये अथवा तुच्छ व्यवसाय करावा लागू नये या
भितीपोटी स्वार्थशास्त्र स्वीकारलेल्या प्रसारमाध्यमांनी दारिद्ररेषेखालील
जीवनाकडे कधी जवळून पाहिले आहे का...?
शंभर कोटी रूपयांचा ‘बिझनेस’ करणारा
रोहीत शेट्टी व इतर दिग्दर्शक-अभिनेते-निर्माते यांना गरीबी कधी शिवली आहे का...?
No comments:
Post a Comment