पैशासाठी वाटेल ते करणारे सेवा क्षेत्र आज
भारतीय अर्थव्यवस्थेच्या कणा बनू पाहत आहे. प्रसार माध्यमाच्या महिती सेवांचा
व्यापक व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात.
गाड्या, साड्या, ज्वेलर्सची दूकाने, मॅक्डोनल्डस, साबण आणि बांधकाम व्यवसाय
व्यवसायाच्या व राजकीय बातम्यांनी(पेड न्यूज) मिडीयाविश्व आपले ‘अर्थ’ (नव्हे स्वार्थ) साधन आहे.
तेव्हा माध्यमांचे हे स्वार्थशास्त्र सामान्य जनतेच्या कल्पनेपलिकडचे आहे. कलर्स
वाहिनीच्या मायक्रो इकॉनॉमिक्सचा अंदाज घेतला तर करोडो रूपये एका कार्यक्रम
निर्मितीला व त्याच्या प्रमोशनसाठी खर्च होतात. बिग-बॉस, धार्मिक कार्यक्रम, इतर
रिअॅलिटी शोज तयार करून व मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपल्याकडे खेचून टी.आर.पी.
वाढवला जातो. परंतू टिव्ही माध्यामाचा रंग बेरंग करून माध्यामांची ही दर्जाहीन
आर्थिक खेळी कितपत योग्य आहे...?
Sagepub.com या संकेतस्थळावरील एका ई-बूकमध्ये मिडीया
इकॉनॉमिक्सची चांगली व्याख्या केली आहे. ती अशी की, It is concerned with
range of issues including international trade, business strategy, pricing
policies, competition and industrial concentration as the affect media firms
and industries.
जीडीपी
वाढीसाठी माध्यम उद्योग देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी काय करत आहे व स्वतःसाठी काय
काय करत आहेत याचा हा संक्षिप्त आढावा.
गल्लोगल्ली मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे
जाहिरातदार, मार्केटींग प्रतिनिधी, व्यवस्थापनाच्या स्वार्थशास्त्राचे प्रयोग करत
असतात. स्किम पॅकेज, स्पेस सेलिंग, टाईम सेलिंग, प्रपोगेन्डा इमेज बिल्डींग,
पब्लिक रिलेशन्स, स्पर्धा, सी.एस.आर. अशा एक ना अनेक मार्गांनी रोजची भागम् भाग
करावी लागते. पत्रकारांनाही बातमी छापण्याची व न छापण्याची मिडीओक्रसी करावी
लागते. पंचवीस हजार व त्यापेक्षा आधिक जाहिरात मिळवून देणारा माध्यमकर्ता (मग तो
ग्रामीण असो, आडाणी असो वा अननुभवी) माध्यजागामध्ये त्याचे खुल्या हाताने स्वागत
होते. द इंडीयन एंटरटेनमेंट अँड मिडीया इंडस्ट्री २००६ या फिक्कीच्या अहवालामध्ये
जादियात, टिव्ही सॉफ्टवेअर प्रोडक्शन, केबल नेटवर्क, डी.टी.एच., एफ.एम्.रेडिओ,
प्रिंट मिडीयासाठी शंभर टक्के एफ.डी.आय. मान्य केला आहे. माध्यम जागतात नविन
प्रवेश घेणाऱ्यांनाही मालकत्व व व्यवस्थापनासाठी विशेष अनुदान उपलब्ध आहेत.
काशीबाई
थोरात हिने आयबीएन लोकमत सोडताना माझ्याशी विशेष बातचीत केली. अर्थाचे गणित
बिघडलेल्या आयबीएनच्या व्यवस्थापनाला महिला कर्मचाऱ्यांबद्दल आर्थिक शोषण करताना
जराही शरम वाटत नाही. इनपूट डेस्कला सलग तीन वर्षे काम करणाऱ्या काशीबाईला अखेर
चॅनेल सोडावे लागले. निखिल वाघ यांने सुद्धा मित्रत्वाच्या नात्याने त्याने एबीपी
माझा (तेव्हाचे स्टार माझा) चॅनल का सोडले याचे दुःख व्यक्त केले. ग्रामीण भागातून (विदर्भ, मराठवाडा) आलेल्या
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या वृत्तविश्वामध्ये काडी मात्र किंमत
नाही. अनेक संघर्षातील इतक्या मोठ्या बॅनरखाली काम करताना माझे कुटूंब अभिमानाने
गावागावमध्ये माझा पीटूसी बद्दल सर्वांना सांगत असे. परंतू आता टिव्ही पत्रकारीता
आयुष्यात करणार नाही कारण माध्यमाच्या अर्थपिपासू धोरणांमध्ये चोवीस तास
झिजण्यापेक्षा एका व्यक्तीचा वा संस्थेचा पाच तास जनसंपर्क करणे केव्हाही चांगले.
रिपोर्ताजचे मंदार करंजाळकर यांनीहा आयबीएन सोडून विविध शासकीय, जनजागृती
कार्यक्रम करायचे ठरवले. एकूणच काय तर माध्यमांतील आर्थिक व्यवस्थापनामध्ये
माणुसकी नसून / एच.आर. ला तुच्छ लेखून धंदेवाईक पणा वाढला आहे.
No comments:
Post a Comment